मला खास आवडलेले पुस्तक
‘नटसम्राट’ या नाटकाने प्रत्येक मराठी नाट्यरसिकाच्या मनात घर केले आहे. शेक्सपिअरच्या ‘किंग लियर’ने शिरवाडकरांच्या लेखनाला चालना दिली असली तरी त्यानंतर त्यांच्या प्रतिभेने झेप घेऊन ह्या नाटकाला अत्यंत जीवघेणी आर्तता मिळवून दिली आहे. यातील गणपतराव बेलवलकर ह्या वृद्ध नटाचे आणि त्यांचे ‘सरकार’ कावेरी यांचे व्यक्तिचित्रण अनेक कलावंतांना मोह पाडणारे आहे आणि गेली पन्नासहून अधिक वर्षे ते जिवंत आहे. ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळालेले हे एकमेव नाटक. ‘मराठीतील सर्वात वाचले, अभ्यासले गेलेले नाटक’ असे याचे वर्णन केल्यास ते अतिशयोक्त ठरू नये. ‘नटसम्राट’ची मोहिनी फक्त मराठी वाचकांनाच वाटलेली नाही त्यामुळेच ह्या नाटकाचे अनेक भाषांतून अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.
आदरणीय कैलासवासी वि. वा. शिरवाडकर लिखित नाटक नटसम्राट (१९७०) मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात एक मैलाचा दगड मानावे लागेल. आप्पासाहेब बेलवलकर या नाट्यकलावंताची ही एक हृदयस्पर्शी शोकांतिका आहे. शिरवाडकरांना शेक्सपिअरच्या किंग लियर नाटकाच्या आधारावर या नाटकाची कथावस्तू सुचल्याचं त्यांनी स्वतः कथन केले आहे. वेळेचं भान ठेवून या नाटकाच्या कथावस्तू बद्दल आणि एकूण नाटकाच्या अन्य घटकांच्या विस्तारा कडे न पाहता आप्पासाहेब बेलवलकर या व्यक्तिरेखेबद्दल आपल्याला इथे बोलायचे आहे. वास्तविक पाहता आप्पासाहेब बेलवलकरांच्या व्यक्तिरेखे भोवती या संपूर्ण नाटकाची कथावस्तू, विषय मांडणी गोवली गेली आहे. परिवारासाठी सर्वस्व त्यागल्या नंतर नटसम्राट आप्पा बेलवलकर यांचा जो हृदयद्रावक अंत होतो, तो कुटुंब संस्थेवर प्रश्न उभा करतो. १९७० च्या दशकातच तथाकथित आधुनिक युगाची नांदी झाली होती. विस्कळीत कुटुंब व्यवस्था हे या तथाकथित पुरोगामी आधुनिक समाजाचं द्योतक मानलं जावं. आम्ही आमच्या संस्कार प्रधानतेचा फार टेंभा मिरवीत असतो. वृद्ध मातापित्यांच्याबद्दल आमच्या ही समाजात किती आस्था आहे, याचं ज्वलंत उदाहरण म्हणून नटसम्राट नाटकाकडे पाहता हेच खटकतं की सुधाकर, नलिनी सारखी कृतघ्न आणि स्वार्थी मुलं आप्पासाहेबांसारख्या संवेदनशील, सृजनशील आणि कर्तव्य तत्पर वृद्ध पित्याच्या नशीबी असावीत का? हिमालयासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या आप्पासाहेब बेलवलकरांच्या संस्कारांचा ही या स्वार्थी, कृतघ्न तरूण पिढीवर काही परिणाम न होण्या इतकी संवेदनाहीन मुलं आजच्या आधुनिक समाजात निर्लज्जपणे वावरत आहेत. कर्तृत्व शून्य ही तरुण मंडळी आप्पासाहेब बेलवलकरांसारख्या सृजनशील, संवेदनशील आणि कर्तृत्ववान समाजाच्या आधारस्तंभाची अवहेलना करतात. शिरवाडकरांच्या दमदार लेखणीतून उतरलेली आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तिरेखा डॉक्टर श्रीराम लागूंच्या सरस अभिनयाने इतकं प्रभावशाली झालं आहे, की आज पाच दशकाहून अधिक वर्षे झाली असून ही नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकर हे प्रेक्षकांच्या मनाचा आजही ठाव घेतात. आम्ही आमच्या संस्कार प्रधानतेचा फार टेंभा मिरवीत असतो. वृद्ध मातापित्यांच्या बद्दल आमच्या ही समाजात किती आस्था आहे, याचं ज्वलंत उदाहरण म्हणून नटसम्राट नाटकाकडे पाहता हेच जाणवतं, की सुधाकर, नलिनी सारखी कृतघ्न आणि स्वार्थी मुलं आप्पसाहेबांसारख्या संवेदनशील, सृजनशील आणि कर्तव्य तत्पर वृद्ध पित्याच्या नशीबी देव अशी संतान का देतो? हिमालयासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या आप्पासाहेब बेलवलकरांच्या संस्कारांचा ही या स्वार्थी, कृतघ्न तरूण पिढी वर काही परिणाम न होण्या इतकी संवेदनाहीन मुलं आजच्या आधुनिक समाजात निर्लज्जपणे वावरत आहेत. कर्तृत्व शून्य ही तरुण मंडळी आप्पासाहेब बेलवलकरांसारख्या सृजनशील, संवेदनशील आणि कर्तृत्ववान समाजाच्या आधारस्तंभाची अवहेलना करतात. शिरवाडकरांच्या दमदार लेखणीतून उतरलेली आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तिरेखा डॉक्टर श्रीराम लागूंच्या सरस अभिनयाने इतकं प्रभावशाली झालं आहे, की आज पाच दशके झाली असून ही नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकर हे प्रेक्षकांच्या मनाचा आजही ठाव घेतात. मी कैलासवासी वि वा शिरवाडकर लिखित नाटक नटसम्राट मधील आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तिरेखा याविषयी आज इतक्या वर्षांनंतर बोलतो आहे; कारण “नटसम्राट” नाटक स्थळ, कालाबाधित नाही. तथाकथित आधुनिक समाजात कुटुंब संस्थेला कसा तडा गेला आहे आणि वृद्धापकाळाने त्रस्त पीढीविषयी कशी संवेदनाहीन आली आहे, याचं चपखल चित्रीकरण या नाटकात झाले आहे.
–रोटॅरियन डॉक्टर राजेन्द्र पडतुरे
