अभिप्राय

महानाद ढोल ताशा कार्यशाळा

              नमस्कार, गेले दोन दिवस फार छान गेले.. माझ्या सारखंच अजुन काही लोकांचे स्वप्न असाव कि एकदा ढोल ताशा शिकावे आणि ते साकार झाले.. त्या साठी महानादच्या टिमचे खुप खुप आभार कि आम्हाला हि संधी दिलीत.

              बाकी हर्षदबद्दल बोलेल तेवढं कमीच अगदी तसंच जसं गैले दोन दिवस त्याच्याकडे बोलायला काहच कमी पडत नव्हतं.. मि हर्षदला तशी बरीच वर्षे ओळखतो, कार्यक्रमांना भेट होते. अवांतर भेटी पण होतात पण कालचा हर्षद वेगळा होता.. नेहमी त्याला बोलतं कराव लागतं हा माझा अनुभव होता पण तो काल खोटा ठरला.. कारण त्याच passion , ती तळमळ त्याच्यात किती आहे ते ह्यावरून जाणवलं.. आणि ते एक कारण आहे की महानाद continue करायचं …passion, passion and passion.. hatsoff to You Harshand..

              बरं फक्त हर्षदच दिसला का तर नाही महानाद चे सगळे volunteers जिथे जमेल तिथं आपल योगदान देत होते. पळत होते.. कोणी काऊंटला दमला असं वाटलं की हळुच कोणीतर आपल्याला न कळत त्याची जागा घेत होते.. दोन दिवसात कोणाच्या चेहऱ्यावर त्रागा दिसला नाही, राग, कि चिडचिड.. सगळे पुर्ण जिव लावुन शिकवत होते. समजावत होते.. आणि जे दोन दिवस बोलले जात होते ढोलताशा एकाचा नाही तर टिमचा आहे.. टिम वर्क आहे आणि त्यात लहान मोठा कोणी नाही, हे ते पदोपदी जानवत होते.. कारण त्या सगळ्यांनी महानाद ला आपल्यात सामावून घेतलयं असंच मला वाटले..क्षमस्व सगळ्या volunteer ची नावं माहिती नाहीत त्यामुळे नामोउल्लेख टाळतोय कोणाचं नाव चुकु नये हाच हेतु… ह्या सगळ्यात समजावणारी पण आणि मधेच रागावणारी पुजा पण बरचं महत्वाचं काम करत होती… आणि हो आमच्या खाण्यापिण्याचे नियोजण व त्या वेळेवर तिचे भारीच लक्ष होतं🙏

              एकदंरीत एक चांगला अनुभव होता.. teamwork काय असते व ते कसं असावं ह्याच उत्तम उदाहरण पहायला मिळाले… बरचं काही अजुन शिकायचं आहे त्यामुळे लवकरच भेटु मी चुका करायला व तुम्ही त्या सुधरूण तुमच्यासारखं बनण्यासाठी 🙏

धन्यवाद

बापू शिंदे

-x-x-x-x-x-x-x-x-

Maharashtra sodun mala 29 varsha hot aali. @⁨Bapu Shinde⁩ chya sarkhi Marathit li comfort level rahili nahi aahe. So english….

              Thanks to all the members for conducting the workshop with so much passion. It was very well organized. 🙏🏼 Also, the workshop gave a taste of the art of the possible & also the hard work behind the scenes to make it happen. Not all glitz and glory like on Instagram.

Both hands with aching today in different ways. Made typing a bit more fun. And the mudgar class today much more challenging. But it is sweet pain as a new skill got unlocked.

              Lastly, thanks again to Harshad Barve and Pooja Sonawane, the H-P powering the show. Looking forward to some more sweet pain. 

And remember it’s Dhin-Dhin …….. Dhin and not Dhin-Dhin-Dhin!

Harshavardhan Joshi

-x-x-x-x-x-x-

The workshop was very engaging and has increased my interest in joining a Pathak. It also gave me confidence that with discipline and persistence, we can learn and perform well. Everyone in the team and all participants were very supportive. Thank you for organising such a wonderful workshop, and special thanks to Harshad, Pooja and the entire MAHANAAD team !!! Kudos

Ashwini

-x-x-x-x-x-x-

   महाराष्ट्र मंडळ बंगळुरू, दरवर्षी आपल्यासाठी नवनवीन उपक्रम घेऊन येत असतं . त्यामुळे यंदा महाराष्ट्र मंडळ बंगळुरूने, ‘महानाद’ या ढोल ताशा पथकाची दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती .

     गेली दोन वर्षे, गणपती विसर्जन दरम्यान, मी ‘महानाद’ अनुभवला. आणि तेव्हापासून मनात ‘महानाद’ चा एक भाग व्हायची प्रचंड ईच्छा होती. त्यामुळे 7 व 8 मार्च ला कार्यशाळा आहे, हे कळतांच मी त्यात भाग घेतला. तब्बल 30 जणांनी यात भाग घेतला. दोन दिवस ही कार्यशाळा चालली. आणि हे दोन दिवस संपूच नये असंच वाटावं, असा हा छान अनुभव होता.

       या दोन दिवसात बरंच काही करायला मिळालं, शिकायला मिळालं. ‘सम’ काय? पासून ते ‘थापी’ काय? पर्यंत. ढोल बांधायचा कसा?  पासून, ते सोडायचा कसा? पर्यंत. जेवढा ‘ढोल’ महत्वाचा, तवेढाच ‘ताशा’ आणि ‘झांज’ देखील महत्वाचे. आणखीन बरंच काही.

        हे सगळं शिकविणारे हर्षद बर्वे. हर्षद बर्वे यांनी ज्या उत्साहाने आणि कळवळीने हे सगळं शिकविलं, त्यावरून ढोल-ताशा वरचं त्यांचं प्रेम व ही संस्कृती जपण्याचा त्यांचा खटाटोप दिसून येतो. एवढेच नाही तर, ‘महानाद’ ची पूर्ण टीम ची सुद्धा खूप मदत झाली. त्यांच्या मदतीमुळे हे सगळं खूप सोप्पं होत गेलं. ही संधी आम्हाला दिल्याबद्दल, मी महाराष्ट्र मंडळ बंगळुरू चे आणि हर्षद बर्वे आणि त्यांचे टीम चे आभार मानते.

        या दोन दिवसाच्या कार्यशाळेचा परिणाम म्हणजे, डोक्यात, कानात कायम ‘एकचं नाद’ ऐकू येतो ……तो म्हणजे ‘महानाद’.

 धन्यवाद!

अपूर्वा जोग

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *