संवाद

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

इ – स न वि वि  जून आणि जुलै २०२६ चा जोड अंक तुमच्याकरिता घेऊन आलो आहोत.

      बेंगळूरु मधील पावसाळा सूर आणि तालावर मंत्रमुग्ध होत सुरू झाला हे खरं! नुकत्याच झालेल्या अभंगवारी आणि फोक लोक ह्या कार्यक्रमांना  मिळालेला भरघोस प्रतिसाद हेच सिद्ध करत आहे.

      अशीच पसंतीची दाद पुढील सर्व कार्यक्रमांना देखील मिळत राहील ही आमची अपेक्षा आहे.

आगामी कार्यक्रमांविषयी आम्ही सातत्याने सोशल मीडियावर, व्हॉट्सॲपवर सूचना देत असतो. हेतू हाच की तुम्हाला चांगला कार्यक्रम पाहायला मिळेल. मित्रमंडळी आणि कुटुंबियांना समवेत घेऊन अगदी आवर्जून येत जा, तुमची भेट झाली की आम्हाला समाधान वाटते.

      ऑगस्ट महिन्यातील हक्काचा कलामंच कुठल्या कलेला प्राधान्य देणार आहे ह्याबद्दल तसेच १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाची माहिती आपल्याला लवकरच दिली जाईल.

      एक महत्त्वाचे लक्षात आहे ना…स न वि वि गणेशोत्सव विशेषांक स्पर्धांच्या नावनोंदणीची अखेरची तारीख जवळ येत आहे. आपले लिखाण आणि चित्र आमच्याकडे लवकर पाठवा. अभिवाचन स्पर्धेतही भाग घ्या.

      गणेशोत्सवात विविध गुण दर्शन होणार आहे त्याविषयी माहिती संबंधित संघाना दिली जाईल.

जून जुलै महिन्यात मंडळाच्या सभागृहात महानाद हा आपल्या ढोल ताशा पथकाचे वाद्यपूजन, नव्या जुन्या सभासदांची स्नेहभेट, नृत्य विशेष हक्काचा कलामंच आणि अभिवाचन कार्यशाळा असे एकाहून एक सरस कार्यक्रम आयोजित केले गेले होते. वाचकांसाठी त्याचे अभिप्राय आणि फोटो अंकात दिले आहेत.

      २१ जून २०२६ रोजी कर्नाटकाच्या राजभवनात विविध राज्यांच्या राज्यस्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्र मंडळातील गुणी कलाकारांना महाराष्ट्राचा सांस्कृतिक कला वारसा सादर करण्याची संधी मिळाली. ह्या कार्यक्रमाचे फोटो आणि वृत्तांत ह्या अंकात वाचायला मिळेल.

Folk lok ह्या कार्यक्रमातील ऊर्जा अनुभवणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. त्याचे फोटो अंकात दिले आहेत.

दोन महिन्यातील भरगच्च कार्यक्रम बघता अंक थोडा मोठा झाला आहे तेव्हा वेळ काढून अवश्य वाचा आणि आपला अभिप्राय नक्की पाठवा. आपल्या प्रतिसादाने आमचा हुरूप वाढतो.

धन्यवाद

राधिका मराठे

संपादक मंडळ

इ – स न वि वि

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *