संवाद

— रेवती कुलकर्णी, संपादक मंडळ सनविवि —

नमस्कार, रसिक वाचक हो!

   कोरोनाचे मळभ आता जवळ जवळ दूर झाले आहे.  त्यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण पसरले आहे. मग आपले मंडळ थोडेचमागे रहाणार?  एप्रिल महिन्यात आपल्याही मंडळात दोन सुरेख कार्यक्रम आयोजित केले होते. 

गुढीपाडव्याला मंडळाच्या वर्धापन दिनाला सत्यनारायण पुजेने सुरवात झाली आणि वातावरण मंगलमय झाले.

   नंतर रविवार दिनांक १० एप्रिल रोजी आपला मानाचा अभिमान आणि योगदान पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. महाराष्ट्राचे भूषण असलेल्या किर्लोस्कर कुटुंबियांपैकी बेंगळुरूमध्ये आपल्या व्यवसायचा पसारा यशस्वीपणे वाढवणारे श्री विक्रमजीकिर्लोस्कर ह्यांना यंदाचा अभिमान पुरस्कार आणि मंडळाच्या सर्वांगीण वाढीसाठी झटणाऱ्या श्रीमती पद्माताई टोळ ह्यांना योगदानपुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह्या अंकात त्यासंबधी सविस्तरपणे वाचायला मिळेलच.

     शुक्रतारा, अरूण दाते आणि रसिक ह्यांचे खूप जुने नाते, म्हणजे जवळजवळ ६० वर्षापासूनचे!  ह्या गाण्याच्या आणि ह्या आवाजाच्याप्रेमात नाही असा रसिक विरळाच!

    ह्या गाण्याला ६० वर्षे झाली ह्याचे निमित्त साधून अरूण दात्यांचे सुपुत्र श्री. अतुल दाते ह्यांनी सुप्रसिद्ध गायक मंदार आपटे आणि वर्षाजोशी ह्यांना घेऊन “नवा शुक्रतारा” नावाचा एक अतिशय सुश्राव्य कार्यक्रम तयार केला आहे. 

तो त्यांनी आपल्या मंडळात २३ एप्रिल रोजी अतिशय सुरेलपणे सादर केला. रसिकांना तो फारच आवडला. त्यांनी standing ovation देऊन कलाकारांचा गौरव केला. 

     १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मंडळाच्या सभागृहात एक धमाल मस्तीचे  स्नेहसंमेलन संपन्न झाले. 

मंडळाच्या नॅार्थ बेंगळूरूच्या टिमने त्याचे अतिशय नेटकेपणाने आयोजन केले होते. मुलेच काय त्यांच्या आईबाबांनीही मस्त धमालकेली. 

   अभिव्यक्तीतर्फे नेहमी सुट्टीत मुलांसाठी काही कार्यक्रम आयोजित केले जातात. ह्यावर्षी २३ एप्रिल रोजी बच्चेकंपनीसाठी ॲानलाईनमेळावा आयोजित करण्यात आला होता. तो त्यांनी अतिशय छान प्रतिसाद देऊन खूप एन्जॅाय केला. 

     आपले कार्यक्रम यु-ट्युबवरही उपलब्ध आहेत. ज्यांना काही कारणांनी ते बघता आले नसतील ते तिथे बघू शकतात. 

    मंडळात आता नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम आयोजले जातील. त्याची वेळोवेळी माहिती दिली जाईलच!

   दरवर्षी काढण्यात येणारी वर्षासहल दोन वर्षे कोरोनामुळे स्थगित केलेली होती. ती यंदा ४ जून रोजी काढण्याचे ठरले आहे.  त्यानिमित्ताने बेंगलोरमधल्या मराठी मंडळींना बच्चेकंपनीसह एकत्र धमाल करण्याची संधी मिळणार आहे. सगळ्यांनी दिलेल्या अवधीतआपली सीट नक्की बुक करा.

   साहित्योन्मेष ही स्पर्धा दिवसेंदिवस चुरशीची होत चालली आहे. सारे लेखक दिलेल्या विषयांवर दिलेल्या मुदतीत त्यांचे सुरेखकल्पनाविष्कार सादर करत आहेत. वाचकांनी त्यावरच्या आपल्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला मेल कराव्यात. आपल्या काही सुचनाअसतील तरी वेळोवेळी आमच्या पर्यंत पोचवल्या तर आम्ही आपले आभारी होऊ.

     महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !! 

सगळ्यांचे आरोग्य अक्षय्य राहो अशी ह्या महिन्यात येणाऱ्या अक्षय्यतृतियेदिवशी प्रार्थना करुया!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *