–स्मिता बर्वे–टीम सनविवि–
महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूच्या सर्व सभासदांना, सनविविच्या चोखंदळ वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्षात जाण्याआधी थोडेसे गत वर्षाविषयी. कोणताही कार्यक्रम ठरविताना, ऑनलाइन की ऑफलाईन हा विचार सतत करावा लागत होता. पण मराठी उद्योजक मेळावा, दीपोत्सव आणि शब्दाक्षरी हे कार्यक्रम महाराष्ट्र मंडळाच्या सभागृहात संपन्न झाले.
शब्दाक्षरीबद्दल ह्या अंकात वाचायला मिळेल. सौ. विद्या चिडले यांच्या वनौषधी ह्या सदरात कोथिंबीर आणि पार्स्ले ह्याबद्दल जाणून घेऊ या.
महाराष्ट्र मंडळाच्या वाचनालयाच्या सभासदांसाठी आयोजित केलेल्या *मला आवडलेला दिवाळी अंक* ह्या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद द्यावा.
इ सनविवि असल्याने त्याचा आवाका वाढला आहे. मराठी उद्योजकांना जाहिरातीमार्फत ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा सनविवि हा उत्तम पर्याय आहे. त्याच बरोबर रेशीमगाठी ह्या सदरात वधूवरांची माहिती जरूर द्यावी.
गणेशोत्सव विशेषांकाच्या प्रकाशन समारंभात ‘साहित्योन्मेष’ स्पर्धा जाहीर केली होती. सांगायला अतिशय आनंद होतो आहे की ह्या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास पन्नास उत्सुक लेखकांनी ह्या स्पर्धेविषयी चौकशी केली. ही स्पर्धा बारा महिने चालणार असल्याने आम्ही फक्त 25 जणांना ह्यात सहभागी करून घेतले आहे. ह्या महिन्यापासून वाचकांना ह्या स्पर्धेतील लेख वाचायला मिळतील. साहित्योन्मेष स्पर्धेतील लेखांवर आपले अभिप्राय जरूर लिहून पाठवा. उल्लेखनीय अभिप्रायासाठी आपले सभासद श्री. पुरूषोत्तम करमरकर यांनी पारितोषिक जाहीर केले आहे. जास्तीतजास्त वाचकांनी अभिप्राय देऊन स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे.
जाता जाता आणखी एक महत्त्वाची घोषणा *रंगदक्षिणी* ही स्पर्धा लवकरच घोषित करण्यात येणार आहे.
आता सनविवि हे फक्त महाराष्ट्र मंडळ बेंगळुरूचे फक्त मुखपत्र न राहता, एक वाचनीय मासिक असणार आहे. तुमच्या सूचना, अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पोहचवा.
पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
