आपल्या मंडळाची सभासद सौ. मुक्ता कुलकर्णी यांची कन्या चि. ओवी कुलकर्णी हिला उदगीर येथील साहित्य
संमेलनात स्वलिखित कथा वाचण्याची संधी मिळाली. तिचे खूप खूप कौतुक आणि पालकांचे अभिनंदन!
तिने वाचलेली कथा!
प्रसंगावधान
एका शहरात विशाखा आणि व्यंकटेश नावाचे जोडपे राहत होते. त्यांना नऊ वर्षांची प्रिया नावाची चुणचुणीत, आज्ञाधारक मुलगी, तर पियुष नावाचा पाच वर्षांचा मुलगा होता.
दरवर्षी 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या शहरातल्या नगरपालिकेच्या बागेत मोठे फुलांचे प्रदर्शन भरायचे. ते पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकंही यायची त्यामुळे बरीच गर्दी व्हायची, बंदोबस्तासाठी पोलीस असायचे. यावर्षी पांढऱ्या गुलाबांच्या फुलांनी केलेली ताजमहालची कलाकृती मुख्य आकर्षण होती.
व्यकंटेश, विशाखा मुलांना घेऊन प्रदर्शन पाहण्यासाठी गेले होते. ताजमहालची कलाकृती पाहत असताना गर्दीत मुलांचा हात सुटला होता. दोघेही कावरीबावरी होऊन मुलांना शोधू लागली, लोकांना मुलांबाबत विचारू लागली होती. तितक्यात व्यकंटेशला एक फोन आला, “तुमची मुले आमच्याजवळ सुखरूप आहेत तुम्ही बागेच्या फाटकापाशी या.” हे वाक्य ऐकल्याबरोबर ती दोघे तिथे पोहोचली. फाटकापाशी ड्युटीवर असलेल्या पोलिसांजवळ मुलांना पाहून दोघे आनंदली होती. मुलांना जवळ घेत दोघे पोलिसांना धन्यवाद देत होते. पोलीस प्रियाची पाठ थोपटत म्हणाले “खरे कौतुक तुमच्या प्रियाचे! हरवल्यावर न घाबरता लहान भावाला सांभाळत आमच्याजवळ आली, आम्हांला तिने सांगितले आम्ही गर्दीत हरवलो आहोत. माझ्याजवळ माझ्या पप्पांचा नंबर आहे कृपया तुम्ही त्यांना फोन करून आम्ही इथे सुखरूप असल्याचे सांगाल का?” मी लगेच तुम्हांला फोन केला. प्रिया म्हणाली “आईपप्पा, तुम्हीच शिकवलेले होते ना कोणत्याही प्रसंगाला धीराने सामोरे जायचे, घाबरायचे नाही म्हणजे आपल्याला मार्ग नक्कीच मिळतो मी तेच केले.” प्रियाचा त्या दोघांना खूप अभिमान वाटत होता.
कु.ओवी संतोष कुलकर्णी,
इयत्ता चौथी,
एन.सी.एफ.इ. शाळा,
बेंगळुरू
