— माणिक नेरकर —
“शुभ्र स्फटिकासम,दवबिंदू हे
विराजती, हिरव्या पानांवरी
मोतीयाचा हार ल्यालेली जणू
मोहक मदन मंजिरी
प्रभातीची किरणे सोनसळी
झळकती, त्या सुर्यफुलावरी
मधुर गुंजन करीत येती
भ्रमर परागकणांवरी
त्यात मधोमध भगवा झेंडा
फडकतो डौलाने महाराष्ट्रावरी
मनमोहक ते दृश्य दिसे सदा
“सनविविच्या मुखपृष्ठावरी”
