
बेंगळुरू येथे बारा एप्रिल रोजी आनंद इंगळे यांचे..”ये जो पब्लिक है” हे मराठी नाटक पाहीले.
बेंगळुरूच्या महाराष्ट्र मंडळाच्या वतीने… या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
त्या वेळी आनंद इंगळे यांची भेट घेतली.त्यांना विजापुरात… मराठी भाषा आणि शाळा आहेत हे
ऐकून मोठे आश्चर्य वाटले.त्यानां मी त्र्यंबकजी डेंगळे यांच्या कालखंडापासून विजापुरात मराठी भाषा कशी आहे हे सांगितले.बेंगळुरूच्या महाराष्ट्र मंडळासाठी… खास केलेली कविता, ग्रुपच्या संयोजकांना सादर केली.
ये जो पब्लिक है.. हे नाटक प्रेक्षकांना विचारून, त्यांचे मत घेऊन पुढे सरकत जाते. ही अभिनव कल्पना प्रेक्षकांना खूपच आवडली. तुम्हाला हे नाटक पाहण्याची संधी मिळाल्यास अवश्य पहा. कलाकारांबरोबर आपल्यालाही नाटकाचा हिस्सा बनण्याची संधी देणारे हे एकमेव नाटक आहे.
Thanks a lot.
महाराष्ट्र मंडळ बेंगळुरू
प्रेषक: श्रीपाद पटवर्धन.
बेंगळुरू.
