सनविवि मंडळ कार्यक्रम वृत्तांत / अभिप्राय आजी आजोबा क्लब : स्नेहमेळावा वृत्त

आजी आजोबा क्लब : स्नेहमेळावा वृत्त

–धनंजय जोग–

अध्यक्ष,आजी आजोबा क्लब, (महाराष्ट्र मंडळ), बेंगळूरु

कोविड नंतर जवळजवळ सव्वादोन वर्षांनी आम्ही क्लबचे सदस्य स्नेहमेळाव्याकच्या निमित्ताने २६ जून रोजी मंडळात भेटलो. तसे व्हर्च्युअल मेळाव्याच्या निमित्ताने दर महिन्यात भेटत होतोच तथापि प्रत्यक्ष कार्यक्रमाची ओढ आम्हा सर्वांनाच लागून राहिली होती.

 नव्यानेच आमच्या क्लबची सदस्यता घेतलेले श्री. प्रमोद सुलाखे व सौ. छाया सुलाखे यांनी ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र याविषयावर आपले विचार व्यक्त केले.                                                                  

“Astrology as a tool to design life” याविषयी श्री. प्रमोद सुलाखे यांनी शास्त्रीय विवेचन करताना ज्योतिषशास्त्र हे प्राचीन काळापासून आस्तित्वात असणारे ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर बेतलेले एक शास्त्र असून मानवच्या जन्मवेळेची आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात असे सांगितले. ग्रहांची स्थिती संवत्सर, अयन, मास व कालनिर्णय या विषयांवर बोलताना नक्षत्र मालेतील ग्रहांची भ्रमणे, ग्रहणे वैगरे गोष्टीं वरून शुभाशुभ फले ठरवली जातात असेही त्यांनी प्रतिपादन केले.

21st century in view of Vastushastra. याविषयी सौ. छाया सुलाखे यांनी श्रोत्यांना मार्गदर्शन केले. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीत ऊर्जा असते जिचा मानवाच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो, असे सांगून सौ. सुलाखे यांनी वास्तुशास्त्राचे महत्वाचे नियम स्पष्ट केले. इमारतींमध्ये आणि आपल्या आजूबाजूला नैसर्गिक सकारात्मक ऊर्जा विकसित करता येते तसेच ती टिकवूनही ठेवता येते असे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.                               

नंतर सदस्य श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सुलाखे दंपतीने अतिशय सुलभरित्या, समर्पक उत्तरे देऊन त्यांचे शंका समाधान केले.

या मुख्य विषयानंतर सर्वांच्या भोजनाची व्यवस्था क्लबने केली होती. भोजनोपरांत सदस्यांची ओळख, गप्पागोष्टी, कविता, गाणी, अनुभवकथन, नाटकातील स्वगते असा विविध गुणदर्शनांचा नेटका कार्यक्रम झाला. 

महाराष्ट्र मंडळाची सदस्यता घ्यावी आणि मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घ्यावा अशी आजी आजोबा क्लबतर्फे श्रोतृवृंदास विनंती करण्यात आली.                              

उपस्थित सर्व सदस्यांनी आजच्या स्नेहमेळाव्यात उत्साहाने भाग घेतल्यामुळे मेळावा रंगतदार आणि संस्मरणीय झाला.                               

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *