सनविवि कविता आधुनिक भोंडला गीत

आधुनिक भोंडला गीत

रेवती कुलकर्णी 

हादगा  ( कारल्याचे बी पेर गं सुने मग जा …. च्या चालीवर)

आले नवरात्र आला हस्त 

मांडेल सून माझी हादगा मस्त

ऐलमापैलमा भोंडल्याच्या देवा 

हादग्याला करीन, मी तुझी सेवा…

हादगा तुझा मांडू का गं सूनबाई

आहे आज मिटींग माझी

बॅास घेणार आहे परीक्षा माझी

नंतर मांडा तुमचा भोंडला, तुमचा भोंडला..

झाली का गं सुने मिटींग तुझी

आता तरी हादगा मांडू का, मांडू का?

सबमीट करायचीय फाईल माझी

नंतर मांडा तुमचा भोंडला , तुमचा भोंडला…

झाली ना सबमीट फाईल तुझी

आतातरी हादगा मांडू का मांडू का?

क्लायंटचा फोन येणार हो सासूबाई

नंतर मांडा तुमचा भोंडला तुमचा भोंडला..

झाली मिटींग झाला फोन 

फाईलही झाली सबमीट माझी

मिळेल प्रमोशन अन् इंक्रीमेंट आता 

सासूबाई आता मांडा हो तुमचा भोंडला..

आली स्वारी सूनबाईंची

घालून पोनी बॅाबकटची

फेर, गाणी, हश्या ,टाळ्या

गजबजला गं माझा भोंडला माझा भोंडला..

माझ्या दयाळू भोंडल्या देवा 

कृपा माझ्या सुनेवर ठेवा

संसार,ॲाफीसचा सांभाळे तोल

कष्ट तिचे हो आहेत अनमोल…

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *