निवांत
लख्या : ए बोल की, येळ सपल
लक्ष्मी : काय बोलु?
लख्या : अग, म्या बोललुया,धा-बारा दिसात येईन
लक्ष्मी : धा-बारा दिस, बरंय
लख्या : बरंय? म्हंजी ?
लक्ष्मी : म्हंजी .. तुझी मजुरी न्हाई, पोटापान्याचं काय रं, माझ्या मजुरीतनं कसं भागायचं, चार तोंडं हैत खानारी.
लख्या : आता थोडी कळ काढाय हवी लक्ष्मे
लक्ष्मी : कुनी ?
लख्या : म्हंजी ?
लक्ष्मी : तुज निवांत चाल्लया रं हिथं, मजुरी न्ह्याय, दोन येळच आयतं जेवाय मिळत्या, गालफाडं बग कशी वर आल्यात दोन हप्त्यात. तू कशापायी येशील रं ?
लख्या : म्हंजी ?
लक्ष्मी : ह्ये बग लख्या, इतकी बरीस संसार केलाय तुझ्याबरोबर, दोन पोरं केल्यात.
कंत्राटदारानं आपल्यास्नी मारनं काय नवीन न्हाय पर तू असंच हात न्हाय उचलणार न्हाईस सायबावर.
लख्या : म्हंजी? लक्ष्मे, दिवस बदल्यात आता. द्येस सौतंत्र झालाया, रामु सांगत व्हता, शहरात जातपात सपलंय समदं,
समदी मानसं सारखी वागत्यात येकमेकाशी. आता सहन न्हाय करायचं
लक्ष्मी : लख्या, समदं कळतंय मला. म्या सांगत्ये, तू जर आला न्हाईस भाईर, तर म्या बी येणार हिथं जेलमदी,
म्या येकटी का खपू रं, म्या बी राहत्ये की हिथं, निवांत.
ओंकार संगोराम
-x-x-x-x-x-x-x-

मस्त कलाटणी शेवटच्या वाक्यात!