काहीही…
बायको : आपण ना, पुन्हा न्युज पेपर लावूया
नवरा : (प्राणायाम करताना) नको .
बायको : का? अरे महिनाभर तरी लावूया ना?
नवरा : नक्को !!

बायको : का ??
नवरा : अगं, कशाला सकाळी सकाळी त्या न्युज वाचायच्या, आधीच information overload होत असतो. म्हणून तर आपण न्युज चॅनेलचे ऍप्सही काढून टाकले होते. आणि तश्या internet वर सगळ्या न्युज मिळतातच, मग आणखी न्युज पेपर कशाला ? कशाला ते विकतचं दुखणं? उपयोग तर काही नाही. It’s just that we’ll get to know few more things on which we don’t have control. See .. what matters is what actually matters! कुठंतरी सोमालियामधल्या न्युजपेक्षा, आपल्या घराजवळ चांगली भाजी कुठं मिळते .. that matters So we should avoid these clutters and be happy. अज्ञानातंच खरं सुख. Contentment is more important than content!
बायको : अरे ए ए ! रद्दी संपलीये घरातली. घरकामात पेपर लागतात म्हणून म्हणाले महिनाभर पेपर लावूया .. कुणाचं काय तर कुणाचं काय .. काहीही !
– ओंकार संगोराम

1 thought on “दारची फुले ”