— श्रद्धा कुलकर्णी, महाराष्ट्र मंडळ बंगळूरू, नाॅर्थ —
२०२२ या नवीन वर्षाची सुरुवात महाराष्ट्र मंडळ बंगळूरू नाॅर्थने एक पेंटिंगची कार्यशाळा घेऊन केली.
लहान मोठ्या सर्वांनाच रंगांच्या दुनियेत रमायला आवडते. त्यामुळे या कार्यशाळेसाठी सर्व वयोगटातून भरभरून प्रतिसाद मिळाला. एकूण ४० जणांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
निरूपमा चिरमाडे या One Stroke Painting Technique Artist आहेत. त्यांनी ही कार्यशाळा घेतली. one stroke painting कार्यशाळेत त्यांनी एकूण ३ प्रकारचे strokes शिकवले.
निरूपमाने कमी वेळात आपल्या कलेचे सुंदर प्रात्यक्षिक दाखवले.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्वांनी तिची कला शिकण्याचा खूप चांगला प्रयत्न केला.
अशाच प्रकारच्या कार्यशाळा आणि कार्यक्रम या वर्षात देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
तुमचा ही अश्या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे.
