संवाद

नमस्कार ,

आपल्याला भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.

ऑगस्ट महिन्याचा इ स न वि वि २०२६ चा अंक आपल्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे.

      ऑगस्ट महिन्यात आम्ही आपल्याकरता तीन कार्यक्रम घेऊन येत आहोत. पहिला म्हणजे स्वातंत्र्यदिनानिमित्त मंडळात ध्वजवंदनाचा कार्यक्रम आणि डॉक्टर राधिका राव ह्यांचे,” औषधांची योग्य माहिती, आरोग्याची खरी स्वतंत्रता हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे.

दुसरा कार्यक्रम, मोदक कार्यशाळा, जी २९ ऑगस्टला आयोजित केलेली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ह्याचे औचित्य वेगळे सांगायला नको. आपण ह्या कार्यशाळेत नक्की भाग घ्या.

      ३० ऑगस्टला मंडळातर्फे “अभिवाचन स्पर्धा” आयोजित केलेली आहे. ह्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, त्याबद्दल अनेक धन्यवाद ,  आणि ह्याचा एक भरगच्च कार्यक्रम होणार आहे. तेव्हा ह्या कार्यक्रमाला आपला प्रतिसाद आणि उपस्थिती लाभेल अशी आम्हाला खात्री आहे.

ह्या अंकात सभासदांच्या लेखणीला आपल्याला एक नवीन लेखिका मिळाल्या आहेत, त्यांचा पहिला लेख ” खमंग मराठी” नक्की वाचा आणि आपला अभिप्राय आम्हाला कळवा.

      २ ऑगस्ट चे दिनविशेष साधून लोकमान्यांवरची कविता आपल्याला ह्या अंकात वाचायला मिळेल. विद्या पळसुले यांनी  लिहिलेला “समुद्र मंथन” हा अभ्यासपूर्ण लेखही  वाचता येईल.

      पुढील महिन्यात गणरायाचे आगमन होत आहे आणि आपल्या मंडळात त्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. गणेशोत्सवात आपण स न वि वि चा छापील विशेषांक प्रसिद्ध करत असतो, त्याकरता आपली आम्हाला जाहिरात आणि देणगी स्वरूपात मदत हवी आहे, त्याचे आवाहन आणि इतर माहिती लवकरच तुम्हाला पाठवूच. दरवर्षीप्रमाणे तुमच्या उत्तम प्रतिसादाची खात्री आहे

१५ ऑगस्ट, २९ आणि ३० तारखेला भेटूच

कळावे

लोभ आहेच

प्रसाद दाते

इ स न वि वि संपादक मंडळ

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *