चंद्र आहे साक्षीला
पुरूदत्त रत्नाकर
चंद्र आहे साक्षीला
भाबड्या चकोरांचा
चांदण्याला बहर
तुझ्यामाझ्या प्रीतीचा
तुझ्या त्या कटाक्षाने
चिंब झाल्या मनाचा
फुले बघ पिसारा
किती या भावनांचा
तुला बघता क्षणी
श्वास थांबला होता
दरवळला गंध
तारुण्य फुलोर्याचा
ताट नको सोन्याचे
नको मिष्टान्न मला
तृप्त होईन होता
स्पर्श तुझ्या ओठांचा
क्षणासाठी मी तुझा
हात हाती घेतला
कसा पाळू कायदा
आता बाह्यजगाचा
चंद्र देईल साक्ष
निवाड्यात जगाच्या
राहीन मी पाईक
फक्त तुझ्या प्रेमाचा
