महाराष्ट्र मंडळातर्फे नव्याने जाहीर केलेली *प्रेरणा पुरस्कार* ही संकल्पना खरोखर स्तुत्य आहे.
आपण अशा प्रकारचा *योगदान* पुरस्कार देतोच पण भरीव कार्य करणाऱ्या एकाच व्यक्तीला तो दिला जातो.
शंभर वर्षाची वाटचाल केलेल्या एखाद्या संस्थेला सबळ करणारे कित्येक हात असतात.मंडळा बद्दलच्या आपुलकी मुळे काही व्यक्ती अनेक वर्षे सातत्याने मंडळाच्या कामाला हातभार लावत असतात, तर इतर काही व्यक्ती कमी वेळात अतिशय प्रभावीपणे मंडळाची गुणात्मकता वाढवणारे कार्य करीत असतात. अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्ती आणि त्यांचे कार्य मंडळासाठी मोलाचेच असते. त्यांच्या कार्याची कुठेतरी नोंद व्हावी, त्यांच्या कार्याला मंडळातर्फे पोचपावती द्यावी, ह्याच विनम्र भावनेने असे पुरस्कार जाहीर केले जातात. अशा सहृदांचे कौतुक उद्याच्या कार्यकर्त्यांसाठी नक्कीच प्रेरणा स्पद ठरतात !!
जाहीर केलेल्या पुरस्कारांची गरिमा लक्षात घेता, किती कालांतराने हा पुरस्कार द्यावा आणि त्याचे निकष काय असावेत याबद्दल कार्यकारिणीने नक्कीच सखोल विचार केला असणार.
ही प्रथा सुरू करण्या बद्दल कार्यकारिणीचे पुन:श्च अभिनंदन .
रेखा नाईक
