गजल वाचन आणि हक्काचा कलामंच
गझल/काव्य वाचन भारीच. तो देखील कार्यक्रम पाहिला. आता घरी जाऊन मस्त आयपीएल सामना पाहावा असे ठरवून खाली उतरणार तेव्हा राकेश सर, बर्वे काका म्हणाले आता गाण्याचा कराओके कार्यक्रम आहे. थांबा…

मग सुरू झाली ती सुरेल संगीतमय संध्याकाळ…आशाताईंच्या गाण्याने सुरुवात झालेली मैफिल उत्तरोत्तर चढत गेली. मी चक्क आयपीएल सामना देखील विसरलो.
मराठी, हिंदी जुनी नवी गाणी आणि सगळे कसलेले गायक.. केव्हा तरी पहाटे… चा आशाताईंचा सूर आठवला. फिटे अंधाराचे जाळे गाणारी नवी पिढी… आनंद मधील दोन्ही आवडीची गाणी कही दुर जब दिन ढल जाए आणि मैने तेरे लिये ही सात रंग के सपने … अप्रतिम…दोन्ही मूळ गाणी शेकडो वेळा ऐकूनही त्या गाण्याची जादू ओसरत नाही. तीच अनुभूती पुन्हा एकदा घेतली.
किशोरा दा, रफी साहेब, मुकेश, मन्नाडे, लता दीदी, आशाताई..अगदी ये मोह मोह की धागे.. आणि देवा देवा ह्या भन्नाट गाण्याने झालेली मैफलीची सांगता…
त्या नवोदित गायिकेला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.


संपूच नये अशी अशी ही स्वरांनी सजलेली संध्याकाळ. अंतिम गाण्याने अंगावर काटा आला… जबरदस्त क्वालिटी परफॉर्मन्स.
अभिनंदन सर्व गायकांचे आणि आयोजकांचं आज आमच्या सारख्या कानसेन वर्गाला आणि आपल्यातीलच गायकांना हक्काचा कलामंच उपलब्ध करून दिलात. आमची कलेची तृष्णा भागवणारी ही मैफिल …
आयपीएल सामने पुन्हा highlights वर पाहायला मिळतील. पण अशी मैफिल अनुभवायला पुन्हा मिळणार नाही.
पुढील हक्काचा कलामंच विषय नृत्य आहे. त्यासाठी आधीच उत्सुकता वाढली आहे..
पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो.
तुषार भट
श्वेतुष
