काळी मिरी

— सौ. विद्या चिडले —

काळी मिरी…..Black Pepper…..

आम्हा भारतीयांच्या मसाले पदार्थातील खूप महत्त्वपूर्ण  घटक म्हणजे काळी मिरी. भाज्या, लोणची, चटण्या, सॅलड, सूप, सँडविच तसेच काॅन्टिनेन्टल फुड अशा सर्वच प्रकारच्या पदार्थांचा सुगंध, रंग व चव तसेच लज्जत वाढविणारा  व आहारशास्त्रातील आगळेपण जपणारा काळी मिरी हा  औषधीगुणयुक्त मसाले पदार्थ खास  भारतीय वातावरणात पिकणारा   आहे. केरळ, कर्नाटक मध्ये काळी मिरीचे उत्पादन सर्वात जास्त होते.  कोवळी हिरवी मिरी असो वा वाळलेली, दोन्हीचा वापर खाद्यपदार्थातून भरपूर होतो.

काळी मिरीचे औषधीगुण भरपूर आहेत पण तिचे दोषही बरेच आहेत.

१] काळी मिरीच्या सेवनामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

२] शरीराचे detoxification होते.

३] आतडे स्वच्छ होतात.

४] काळी मिरीतील पोटॅशियममुळे हृदयचे ठोके नियंत्रित होण्यास मदत होते.

५] उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

६] लाल रक्तपेशीत वाढ होते.

७] त्वचाविकारवरही फायदेशीर ठरू शकतात. 

८] पचन चांगले होते.

९] सुरकुत्या लवकर पडत नाहीत.

१०] अँटी-बॅक्टेरिल गुणधर्मामुळे श्वसनाच्या व पोटाच्या विकारांवर मिरपूड मधात मिसळून ते चाटण घेणे उपयुक्त ठरते.

११] (Chest congestion होत नाही)

१२] हळद, दूध आणि मिरपूड हे मिश्रण सांधेदुखीवरही लाभकारी आहे. Anti-inflammatory ह्या गुणामुळे सांध्यांवरील सूज कमी होण्यास मदत होते.

१३] रक्तातील शुगरचे प्रमाण नियमित होते.

१४] रक्तपेशीना दुखापत होण्यापासून वाचवते.

१५] मेंदूची तरतरी वाढवते.

१६] अस्थमावरही गुणकारी आहे.

१७] सायनसमुळे कफ संचय झाला असेल तर कफ पातळ होऊन बाहेर पडतो.

१८] दात व हिरड्या दुखत असतील तर मिरपूड मध मिसळून लावतात.

१९] स्त्रियांचे मासिक धर्म नियमित होण्यास मदत होते.

२०] फायटोन्युट्रियंट घटक शरीरातील फॅट्स कमी करतात.

२१] फेस पॅक मधेही मिरी वापरतात. त्यामुळे चेहरा स्वच्छ व त्वचा नितळ राहण्यास मदत होते तसेच त्वचेचे पोत सुधारते.

२२] केसातील कोंडा कमी होतो.

२३] रुचिकारक असल्यामुळे खाण्याची इच्छा वाढते.

२४] जुलाब, पित्त, बद्धकोष्ठता ह्यापासून आराम मिळतो.

२५] लिंबू, चिमूटभर मिरपूड व काळे मीठ ह्याने अपचनची समस्या जाते.

२६] दही व मिरपूड ह्याने डिप्रेशन  जाऊन तरतरी येते.

२६] जंत झाले असतील तर काळी मिरी व मनुका खातात.

२७] तसेच ताकात थोडीच मिरपूड व जिरेपूड घालून सेवन केल्यास पाचन वाढते.

२८] हळदी प्रमाणेच मिरी कॅल्शियम व सेरेनियम ही पोषकतत्वे शोषण्यास मदत करतात.

२९] अल्झायमर व पार्किंसन ह्यावरही  काळी मिरीचे सेवन उपयुक्त ठरते.

 अशा अनेक अनेक गुणधर्मामुळेच आयुर्वेदात काळी मिरीला खूप महत्त्व आहे. ह्या गुणसंपन्नतेमुळे आयुर्वेदिक व युनानी औषधांमध्ये मिरीचा उपयोग केला जातो. रोजच्या जेवणात चिमूटभर मिरपूड असल्यास आरोग्यदायी ठरते.

दोन हजार वर्षांच्या आधीपासून भारतीय पाकशास्त्र व आयुर्वेदिक औषधीशास्त्र ह्यात उल्लेख असणाऱ्या काळ्या मिरीचे, आपल्या देशातील केरळ, कर्नाटक,  आसाम, व कोकण ह्या भागात तसेच दक्षिण आशियातील जावा सुमात्रा येथे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. आपल्या देशातून जितके मसाले पदार्थ निर्यात होतात, त्यात सर्वात जास्त काळी मिरीची निर्यात होते. देशांतर्गत मागणीही खूप आहे. सुगंधी, रुचकर, उत्तेजक व उत्साहवर्धक अशा ह्या मसाले पदार्थाला ‘काळे सोने’ असेही  म्हणतात.

 काळी मिरीला उष्ण व दमट हवामान हवे. समुद्र किनारपट्टीच्या बाजूने ह्या वेली चांगल्याच वाढतात. कोकणात आंब्याच्या झाडाच्या आधाराने तर केरळात सुपारीच्या झाडावर किंवा नारळाच्या झाडाच्या आधाराने ही वेल चढवतात. ह्याची लागवड साधारणतः सप्टेंबर महिन्यात करतात. ह्या वेलीला सुरुवातीला पांढरी व हलकी पिवळट रंगाची बारिक फुलं येतात. वेलीला मिरिचे घोस लागतात. ती फाॅक्सटेलसारखी दिसतात. हिरवी मिरी थोडी पिवळसर व्हायला लागली की वेलीचे घोस तोडून वाळवतात. त्यापूर्वी घोसातील मिरी हाताने चोळून वेगळी करतात व वाळवायला तडव किंवा फडक्यावर पसरवून ठेवतात. पूर्णपणे वाळल्यावर ह्या छोट्या छोट्या फळांना सुरकुत्या पडतात. आता ही मिरी वापरण्यास योग्य ठरते. प्रक्रिया न केलेली मिरी औषधासाठी, अर्क व तेल काढण्यास योग्य ठरतात.

मिरी वाळवण्याची दुसरी पद्धत म्हणजे… घोसातून मोकळी केलेली मिरी एकदा उकळत्या पाण्यातून काढून नंतर वाळवतात. ह्या उकळून काढलेल्या मि-यांना वाळल्यावर सुरकुत्या पडत नाहीत. काळी मिरीचे शेल्फ लाईफ दीर्घ आहे. काळ्या मिरी चुरडून साल काढून पांढरे दाणेही विकतात.

हा मसाल्याचा पदार्थ आपल्या छोटेखानी बागेत लावू शकतो. ह्याची लागवड फार सोपी आहेत. फक्त कुंडीतील मातीत, पाणी धरून ठेवण्याची क्षमता असावी लागते. पाण्याचा निचरा होणारी माती नको.  काळी मिरीचे दाणे कुंडीत टाकून किंवा वेलीचे कटिंग घेऊन लागवड करतात. ही वेल खूप वर्ष टिकते. मातीत सेंद्रिय खत मिसळून कुंडी भरावी. कुठल्याही मातीत मिरी उगवतात. पण लाल माती सर्वात जास्त उपयुक्त असते. मिरीचे दाणे किंवा कटिंग लावल्यावर कुंडीत पाणी टाकावे. रोज पाणी देवून मातीचा ओलावा कायम ठेवावा लागतो. चुना, राॅक फाॅस्फेट व राख ह्यामुळे मिरीची वेल छान वाढण्यास व भरघोस पीक येण्यास मदत होते. ह्या वेलीला आधार लागतो म्हणून किचन गार्डन मध्ये लावताना माॅसस्टिकचा आधारासाठी उपयोग करता येतो किंवा भिंतीच्या आधाराने लावता येईल.

 Vit A, vit C, कॅरोटीन, कॅल्शियम,  सेलेनियम, लोह, पोटॅशियम,  मॅग्नेशियम,  मँगनिज, जस्त, क्रोमियम, प्रोटिन्स, फाॅलेट, पेपेरीन, फोलीक ॲसिड,  अशा अनेक प्रकारची जीवनसत्वे आणि खनिजे यांनी समृद्ध असलेली काळी मिरी आरोग्यपूर्ण ठरते.

 परंतू काळी मिरीचे जास्त सेवन आरोग्यास हानीकारक ठरू शकते. 

मिऱ्याच्या जास्त सेवनाने—-

पोटात, छातीत,घशात जळजळ होते. तोंडाची आग होते. तसेच तोंडात ,घशात अल्सर होऊ शकतो. अति उष्णतेमुळे नाकातून रक्त येते. उन्हाळ्यात तर हा त्रास हमखास होतो.

गर्भवती स्त्रियांनी मिरीचा वापर करू नये.

 ज्यांना डायबेटिस असून औषधं सुरू आहेत, त्यांनी मिरी जास्त प्रमाणात खाल्ली तर शुगरचे प्रमाण  एकदम कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच उच्च रक्तदाबाची समस्या पण उद्भवू शकते.आणि म्हणूनच डायबेटिस वा ब्लडप्रेशरचा त्रास असल्यास डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार मिरीचे सेवन करणे योग्य ठरते.

मिरिच थोडे

आपुल्या जेवणाते

सुगंधित करते.

चिमूटभर

सूप सँडविचच्या

चवीत भर.

लयच भारी

रस्सम दक्षिणेचे

काळ्या मिरीचे.

नजर कैद

हिरव्या घोसावरी

मिरचवरी.

रंगसंगती

न्यारीच लोणच्याची

हिरव्या मिरीची.

राज्य करते

खाद्य संस्कृतीवरी

ही काळी मिरी.

हिरवी काळी

मिरी आरोग्यकारी

चुटकीभरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *