वृत्तांत – डिझाईन थिंकिंग

— -योगेश खांडेकर, महाराष्ट्र मंडळ – बेंगुळुरु नॉर्थ —

Design thinking – Thinking design ह्या विषयावर सुजय घोरपडकर यांनी आपले विचार मांडले. व्याख्यानाची सुरुवात आठवणीतल्या काही गोष्टी आणि त्यांच्या जाहिरातींनी झाली. यातून सुजय यांनी सामान्य माणसाच्या दृष्टीने डिझाईन कसे लक्षात राहते हे दाखवून दिले. त्यानंतर त्यांनी काही आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी, जसे की नळ, यातून डिझाईन, फिचर्स आणि त्यातून त्या गोष्टीची योग्यता कशी बदलते ते स्पष्ट करून दाखवले. सर्जनशीलता आणि डिझाईन म्हणजे काय आणि यांची नक्की सांगड कशी आहे ते उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला. 

एखादी गोष्ट डिझाईन करण्यासाठी एक पद्धतशीर प्रक्रिया आहे. उत्तम डिझाईन होण्यासाठी सहानुभूती आणि आपण काय प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय हे अचूक ओळखता आलं पाहिजे.

आपण सर्व सामान्य लोकांनी गोष्टी विकत घेताना आपल्याला त्या गोष्टीपासून काय फायदा होणार आहे, ह्या विषयी थोडी जाणीव ठेवली, तर नक्कीच आपणाला गोष्टी घेताना फायदा होईल.

सुजय घोरपडकर यांनी हा क्लिष्ट विषय सोप्पा करून सांगितला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *