-- मुग्धा आपटे कोपरकर --
तो आणि मी
पावसाची आणि माझी यारी आहे पक्की
आता येईलच तो, मीही भिजून घेईन नक्की
जनाचं ऐकलं खूप, किती ऐकून घेईन
मनाची हौस माझ्या पुरी करून घेईन
आता येईलच तो, मीही भिजून नक्की घेईन
जुन्या आठवणी मनात राहिल्यात साठून
काळ्याभोर ढगांनी मळभ आलंय दाटून
साचलेलयाला दाटलेल्याला वाट देईन करून
आता येईलच तो, मीही नक्की घेईन भिजून
आज येईल, उद्या येईल, चातक मन वाट पाही
गर्दरानच्या मोराचा रंग मन माझं मोहू पाही
आणि ओल्या मातीचा गंध शहारलेल्या देही
मी वाट पाहत्येय म्हणून येईलंच ना तोही
आत्ता येईलच तो, भिजून घेईन नक्की मीही
