— माणिक नेरकर —
ह्या महिन्याच्या अंकातील जवळपास सर्वच लेख वाचून झालेत आणि एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती अशी की सुरुवातीचे लेख आणि आताचे लेख ह्यात भरपूर फरक पडलेला दिसतो. लिखाणात सहजता आलीये, मॅच्युरिटी जाणवतेय. हे लेखकांचे जितके क्रेडिट तितकेच सनविविचे आहे, हे निर्विवाद सत्य आहे. खरे तर सगळ्यांचेच लेख छान झाले आहेत. विषय तसे शालेय जीवनातील वाटत होते, त्यामुळे लिहिणाऱ्यांची कसोटी तर होतीच, पण प्रत्येकाची “लेव्हल” उंचावलेली दिसली. म्हणूनच आता दिवसेंदिवस लिखाणापेक्षाही वाचनाची उत्सुकता वाढीस लागली आहे, हे नक्की.
