अभिप्राय –सप्टेंबर2022

 

रसिका राजीव हिंगे

 

सनविविचा अंक उघडला अन  मुखपृष्ठावर असलेले बाप्पाचे निशिगंधाच्या फुलांचा हार घातलेले मनोहारी रूप पाहूनच रोमरोम सुगंधित झाले. नकळतपणे मान नमस्कारासाठी वाकली. सुंदर, विलोभनीय अंक.

बाप्पाच्या गळ्यातील हाराप्रमाणेच सगळ्यांच्या लेखण्याही सुगंधित जाणवल्या. किती भरभरून लिहावं प्रत्येकाने. आता खरे तर ही स्पर्धा जाणवत नाही तर एक ऑनलाईन  साहित्य संमेलन भासते आहे. वेगवेगळे लेख, विचार वेगळे पण विषय एकच. किती कंगोरे असू शकतात न एकाच विषयाला. त्याच्यामुळे किंवा तिच्यामुळे माझे आयुष्य कसे बदलले किंवा घडले, या विषयावर  वाचतांना प्रत्येकाचा गॉड फादर असतोच का असे वाटायला लागले, फक्त तो कळायला हवा, ओळखता यायला हवा.  का देवच येतो कोणत्या न कोणत्या रुपात आपापल्या प्रारब्धानुसार! दिशा सापडते जगण्याची.

अतिशय सुंदर लेखन. माझ्यासाठी तर फार मोठी पर्वणी आहे दर महिन्याला. सनविविचे मनःपूर्वक आभार आणि कौतुक. छान विषय आणि विशेष म्हणजे अंकाचे रूप ही मनोवेधक असते दर महिन्याला.

खूप खूप शुभेच्छा सनविविच्या टीमला. उत्तरोत्तर बहारदार अंक यावा या सदिच्छेसह….

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *