
मार्च महिन्यात घेतलेल्या अभिवाचन कार्यक्रमास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महाराष्ट्र मंडळाने एक दिवसीय अभिवाचन कार्यशाळा आयोजित केली आहे.
आपल्या सकस अभिनयामुळे रसिकांना सुपरिचित असलेले श्री. विघ्नेश जोशी कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत.
एखादी साहित्यकृती अधिक प्रभावी पद्धतीने कशी वाचावी याचे शास्त्रशुद्ध तंत्र आत्मसात करण्यासाठी लवकरात लवकर सोबत दिलेला गूगल फॉर्म भरून आपली उपस्थिती कळवा. आम्ही नोंदणीसाठी आपणाबरोबर संपर्क करू.
सर्वांच्या सोयीसाठी आणि जास्तीत जास्त सहभागासाठी ही एक दिवसीय कार्यशाळा आपण दिनांक 13 जून आणि 14 जून 2026 अशी दोन वेळा आयोजित करत आहोत. कार्यशाळा पूर्ण केल्यानंतर सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
कृपया तुम्हाला सोयीस्कर असणाऱ्या अशा एकाच तारखेचा पर्याय फॉर्ममध्ये निवडावा.
https://forms.gle/udv6aFm5ndJ54HGA6
कार्यशाळेसाठी आता अगदी मर्यादित जागा उपलब्ध आहेत याची कृपया नोंद घ्यावी. फी- रु १५००/-
( चहा /कॉफी आणि जेवण यासहित शुल्क आहे.)
अनेकांनी विनंती केल्यामुळे गूगल फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २० एप्रिल 2026 पर्यंत वाढवली आहे. फी भरण्यासाठी कृपया दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधावा.
संपर्क : स्मिता बर्वे : 7829901762 , राधिका मराठे : 94483 05067 , दीपा वैद्य : 98441 33707 पल्लवी दाते : 99808 38915
