संवाद

नमस्कार ,

एप्रिल महिन्याचा इ स न वि वि २०२६ चा अंक आपल्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे.

   मार्च महिन्यात महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुचा संस्थापक दिन उत्साहात पार पडला. प्रथेप्रमाणे,  मंडळात श्री सत्यनारायणाची पूजा पार पडली. त्यानंतर “महानाद” ह्या मंडळाच्या ढोल ताशा पथकाचे अतिशय दमदार वादन झाले. ह्यातून ढोल-ताशा पथकाने केलेली मेहनत दिसून आली आणि अनेक तरुण- तरुणी ह्या निमित्ताने मंडळात आले. मंडळाच्या कार्यक्रमांबद्दल त्यांना वाटणारे कुतूहल दिसून येत होते.

मार्च महिन्यातला अजून एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणजे. मंडळातर्फे दिला जाणारा.”योगदान” आणि “अभिमान” पुरस्कार. ह्या कार्यक्रमाचा अभिप्राय आपल्याला ह्या अंकात वाचायला मिळेल.

   मंडळातर्फे जून २०२६ मध्ये एक दिवसीय मराठी अभिवाचन कार्यशाळा आयोजित केलेली आहे, ह्या कार्यशाळेत प्रसिद्ध अभिनेते श्री. विघ्नेश जोशी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण ह्याकरता नोंदणी केली नसेल तर अंकात दिलेला फॉर्म वापरून अवश्य आपले नाव नोंदवा.

   मंडळाचा “हक्काचा कलामंच” उपक्रम आता चांगलेच बाळसे धरू लागलेला आहे. त्याचाच पुढचा कार्यक्रम (karaoke singing)दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी आयोजित केला आहे, आपण तिथे जरूर उपस्थित रहाल अशी आम्हाला खात्री आहे.

मंडळी,  मंडळात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत आहेत, त्यात सहभागी होण्याकरता आपण आपले सभासदत्वाचे नूतनीकरण करून घ्या म्हणजे मंडळाशी संलग्न राहता येईल.

कळावे

लोभ आहेच

इ स न वि वि संपादक मंडळ

प्रसाद दाते

स न वि वि संपादक मंडळ.

अनुक्रमणिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *