किल्ले स्पर्धा २०२५

💠 स्पर्धेचे नियम आणि अटी 💠
♦ या किल्ले स्पर्धेला वयाचे बंधन नाही. लहान मुलेही भाग घेऊ शकतात.
♦ही सांघिक स्पर्धा असून एका संघात कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त दहा लोकांना भाग घेता येईल.
♦ या स्पर्धेचे प्रवेश शुल्क रु. ३०० राहील.
♦ संघांनी किल्ला बनवतानाचे आणि किल्ला पूर्ण झाल्यानंतरचे व्हिडीओ चित्रण निवेदनासकट आम्हांला पाठवायचे आहे. हा व्हिडीओ जास्तीत जास्त ५- ७ मिनिटांचा असावा.
♦ नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२५ आणि व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०२५ राहील.
♦ किल्ल्यासाठी लागणारे सामान संघांनी स्वत: आणायचे आहे (कृत्रिम साहित्य जसे थर्माकॅाल इ चा वापर टाळावा).
♦ऐतिहासिक किल्ला डोळ्यांसमोर ठेऊन त्याची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न असावा. अगदी हुबेहुब नसला तरीही प्रयत्न स्तुत्य असावा.
♦ स्पर्धेचा निकाल हा संकल्पना, सौंदर्य, वापरलेले साहित्य, एकंदर प्रभाव आणि व्हिडिओ प्रेझेंटेशन या निकषांवर लावण्यात येईल.
♦विजेत्यांना आकर्षक बक्षीसे देण्यात येतील.
♦संपर्क : सौ. सुचित्रा खांडेकर – ८४९६०६२८५०
सौ. ऋचिता दवंडे – ९९०२४६३७८८
♦ स्पर्धेचे स्वरूप, नियम ह्याबाबतीत महाराष्ट्र मंडळाचा निर्णय अंतिम राहील.
♦निकालाबाबत परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
♦तुमच्या व्हिडीओ मध्ये तुम्ही तयार करत असलेल्या किल्ल्याचे वेगवेगळे टप्पे तयार करताना दिसतील ह्याची नोंद घ्यावी.
♦ बेंगळूरु बाहेरील स्पर्धकांना ऑनलाईन निकाल पाठवण्यात येईल.
♦ प्रवेश शुल्क भरण्यासाठी मंडळाचा QR Code देण्यात येईल.
♦ खाली दिलेल्या लिंक वरून गुगल फॉर्म भरावा.
