— रेवती कुलकर्णी , बेंगळुरू —
महाशिवरात्री निमित्त…..
ॐनम: शिवाय
गौरांगी लावण्यवती गिरिजा
ही हिमालय, मैनेची आत्मजा…
जडे जीव तिचा भोळ्या शंभूवरी
प्राप्तीसाठी त्याच्या तप ती करी…
परी तपस्येत घोर, मग्न तो नीलकंठ
अन् निर्मितीत सृष्टीच्या पडला खंड..
ब्रह्मा, विष्णू ,देव सारे झाले सचिंत
मदनाला वाटे आव्हान हे यत्कश्चित…
केली भंग तप:श्चर्या त्याने शिवशंभूची
क्रोधांगारात परी शंभूच्या, राख होई मदनाची..
प्रसन्न शिव झाले बघूनी उमेच्या तप:श्चर्येला
झाले काम देवतांचे, शंभूचा रूकार विवाहाला…
प्रणयास रंग चढे, शिवशक्तीचे होई मिलन
हर्ष पसरला त्रिभुवनी, बहरले सृष्टीचे सृजन …
