— राजेंद्र पडतुरे —
समर्थ रामदासांच्या साहित्यकृती सम्पूर्ण मानवजातीला उद्देशून आपला संदेश देतात. समस्त मानवजाती आजकाल तणावपूर्ण स्थितीत असताना समर्थ रामदासांची शिकवण आज २१ व्या शतकात कठीण परिस्थितीतून रस्ता दाखवण्यास योग्य मार्ग दाखवते. मानवी जीवनाचं असं एकंही अंग नाही, ज्याबाबत संत रामदास आपल्याला मार्गदर्शन करत नाहीत. ते आपल्या शिष्यांना (म्हणजे खरं तर सम्पूर्ण मानवजातीला) सल्ला देतात, की माणसाने आपल्या सतत वाचन लिखाणाव्दारे आपल्या बौध्दिक आणि अध्यात्मिक उन्नत्तीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. बौध्दिक आणि अध्यात्मिक उन्नतीमुळे माणसाची भौतिक प्रगती ही होत असते. आज तणाव मानवी जीवनाचं एक अभिन्न अंग आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पध्दती मध्ये गरजा सीमित असत, आणि परिवार मोठे असल्याने गरजांचे नियंत्रण विनासायास होत असे. आज माणूस अति महत्वाकांक्षी झाला असल्याने सातत्याने ध्येयाच्या मागे पळताना माणसाला जास्त प्रतिस्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. आज माणूस अविचारी पणे फक्त ध्येयाच्या मागे धावत आहे. त्या कारणाने माणसाला तणाव आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधीच सतराव्या शतकात समर्थ रामदासांनी या सर्वाची कल्पना करून ठेवली होती. समर्थ रामदासांना सतराव्या शतकातले मॅनेजमेंटगुरू म्हटले जाते. चाणक्य आणि समर्थ रामदासांना पुरातन कालीन मॅनेजमेंट गुरू म्हणतात.
ते म्हणतात, विद्या नाही, बुद्धी नाही। विवेक नाही, साक्षेप नाही।कुशलता नाही, व्याप नाही। म्हणोनि प्राणी करंटा।। यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःकडे काहीतरी हवे. शिक्षण हवे. अशिक्षित असलो, तरी बुद्धिमत्ता चांगली हवी. ते नाही, तर विवेक, विचारपूर्वक, न्याय्य, शुभ, सत्य वागायची सवय हवी. साक्षेप म्हणजे सावधपणा हवा, कौशल्य हवे, व्यवसायाचा व्याप वाढायला हवा. असे काहीच नसेल, तर माणूस अपयशी ठरतो. आळशीपणा, नुसती बडबड या साऱ्याचा समर्थांना अत्यंत राग आहे. खूप व अचूक प्रयत्न करावे, आपल्या कामाचे व व्यवसायाविषयीचे ज्ञान सतत ग्रहण करावे, प्रत्येक काम सकारात्मक दृष्टिकोनाने करावे, कामात एकरूप व एकाग्र असायला हवे, कामात तत्परता (Promptness) हवी, ‘बातें कम, काम ज्यादा’ हवे, अशी कार्यसंस्कृतीची शेकडो तत्त्वे समर्थांनी सांगितली आहेत.1
समर्थ रामदास आणि चाणक्य – पुरातन काळातील दोन दृष्टे मॅनेजमेंट गुरू 2
मॅनेजमेंट संबंधी दासबेाध हा सर्वात जुना आणि महत्वपूर्ण असा ग्रंथ होता. हा ग्रंथ गुरू आणि शिष्या मधील संवादात्मक रूपात लिहिला गेला. इथे गुरू शिष्यांना संबोधून शिकवण देत आहे आणि शिष्य मंडळी आपल्या गुरूला आपल्या शंका विचारत आहेत. रामदासांचे समकालीन आणि त्यांचे पूर्वीचे संत केवळ अध्यात्मिक विषयांवर प्रवचने देत असत, रामदासस्वामी पुढारमतवादी होते. त्यांनी जनसामान्यांना व्यावहारिक, त्यांच्या व्यवसायाविषयी ही मौलिक सल्ला दिला आहे. परकियांच्या सत्तेला कंटाळलेल्या जनतेला हाती शस्त्र घेऊन उभे राहण्याचा सल्ला देणारा हा संत विरळाच होता. सुधीर निरगुडकर लिहितात
” There are several concepts in Ramdas’ literature that are akin to the modern concepts of planning, development of communication skills, human resource management, marketing, leadership development, organizational development and strategic thinking.”सुधीर निरगुडकर मनाचे श्लोक आणि दासबोध ही समर्थ रामदासांची मॅनंजमेंट क्षेत्रातील अत्यंत महत्वाची योगदाने म्हणून पाहतात. अंदाजे ४०० वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी एका दृष्टया युगपुरूषाच्या नजरेतून दासबोध लिहिला असावा. निरगुडकर यांच्या मते दासबोध हा ग्रंथ समर्थांनी आधुनिक काळातील मॅनेजमेंट क्षेत्रासाठीच लिहिला होता. योग्य मॅनेजमेंट असेल तर व्यवसायास भरभराट यायला काही वेळ लागत नाही.
जर व्यवस्थापक आपल्या व्यवसायी कर्मचारी आणि व्यवस्थापन तंत्रातील व्यक्तींशी संवाद साधून त्यांच्या समस्यां विषयी लक्ष ठेवील, तर त्याचा व्यवसाय नक्कीच भरभराटीला लागेल, असे प्रतिपादन समर्थ रामदासांनी त्याकाळीच करून ठेवले होते. जर व्यवस्थापक आपल्या कनिष्ठांशी तुसडेपणी वागेल, जर व्यवस्थापक आपल्या कनिष्ठांशी माणूसकीने वागत नसेल, आपल्या स्थानावर बसून फक्त आदेश देत असेल, तर ते व्यवसाय संपुष्टात यायला वेळ लागणार नाही, असा इशाराही रामदास स्वामी देतात: येके ठायी बैसोन राहिला। तरी मग व्यापचि बुडाला। सावधपणे ज्याला त्याला। भेट द्यावी।
सतराव्या शतकात मुघल सत्तेचा जाच आणि नैसर्गिक संकटांचा तो काळ होता. दूरदृष्टीचा अभाव, स्वार्थीपणामुळे स्थानीय प्रशासक जनतेचा विचार न करता परकीय सत्तेशी हात मिळवणी करून आपल्यावर सत्ताधीशांचा वरदहस्त राहील, असा दृष्टीकोण ठेवत असत. सामान्य जनतेचा कैवारी काणीही नसल्याने जनतेमध्ये नकर्तेपणा व नपूंसकता आली होती. रामदास स्वामींनी अशा मुर्दाड बनलेल्या जनतेला दैववादी दृष्टीकोण सोडून स्वार्थी राज्यकर्त्यां विरूध्द आणि छळवादी परकीय सत्ताधीशांचा मनोनिग्रह करून विरोध करावयाचा सल्ला दिला. समर्थांनी जनतेला विश्वास ठेवायला सांगितले, की जर ते हिम्मत दाखवून आत्मविश्वासाने उभे राहतील, तर डोंगराएवढी संकटे सुध्दा ते पार करू शकतील. लोकांना समर्थांनी पटवून सांगितले, की दृढनिश्चयाने जर ते प्रयत्नशील राहतील, तर मुघलसत्ते विरूध्द ही ते यशस्वीरित्या लढू शकतील. यासाठी दासबोधात ते म्हणतात, की योग्य आणि स्वार्थत्यागी परिश्रमी नेता आणि प्रशासक असणे आवश्यक आहे. राजनेता आणि व्यवस्थापकाच्या कृती आणि करणी मध्ये तफावत असता कामा नये, कारण हे जनसामान्यांचे आदर्श असतात. ते लिहितात
जनी बोलण्या सारखे आचरावे।
विवेके क्रिया आपुली पालटावी।
अती आदरे शुध्द क्रिया धरावी।
जनी बोलण्या सारखे चाल बापा।
का योग्य व्यवस्थापकानी सातत्याने आत्मपरीक्षण करून आपल्या व्यवहारात कोठे काही चुकत तर नाही, याचे मूल्यमापन करत रहावे. हे कायम लक्षात रहावे, की आपण जसे वागू, तशी जनता चालेल व्यवस्थापन क्षेत्रात विद्या नाही, बुद्धी नाही। विवेक नाही, साक्षेप नाही। कुशलता नाही, व्याप नाही। म्हणोनि प्राणी करंटा।। अशा माणसाचा शिरकाव नसावा. ते म्हणतात, यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःकडे काहीतरी हवे. शिक्षण हवे. अशिक्षित असलो, तरी बुद्धिमत्ता चांगली हवी. ते नाही, तर विवेक, विचारपूर्वक, न्याय्य, शुभ, सत्य वागायची सवय हवी. साक्षेप म्हणजे सावधपणा हवा, कौशल्य हवे, व्यवसायाचा व्याप वाढायला हवा. असे काहीच नसेल, तर माणूस अपयशी ठरतो. आळशीपणा, नुसती बडबड या साऱ्याचा समर्थांना अत्यंत राग आहे. खूप व अचूक प्रयत्न करावे, आपल्या कामाचे व व्यवसायाविषयीचे ज्ञान सतत ग्रहण करावे, प्रत्येक काम सकारात्मक दृष्टिकोनाने करावे, कामात एकरूप व एकाग्र असायला हवे, कामात तत्परता (Promptness) हवी, ‘बातें कम, काम ज्यादा’ हवे, अशी कार्यसंस्कृतीची शेकडो तत्त्वे समर्थांनी सांगितली आहेत.
या द्रष्ट्या संतानी सतराव्या शतकातच व्यवस्थापन विषयी इतका सखोल विचार करून ठेवला होता, की आजही २१ व्या शतकात त्यांनी आपले व्यवहार चातुर्याचे दर्शन घडवून त्या वेळी, जेव्हा औद्योगिक परिसर अस्तित्वातही नव्हते, तेव्हाच इतकी मौलिक सूत्रे सांगून ठेवली होती, की यातील व्यवस्थापनाची सूत्रे अमलात आणली गेली तर भारताला सुखी आणि संपन्न व्हायला वेळ लागणार नाही.
1 यशस्वी व्यवस्थपना साठी समर्थ सूत्रे, अनिल सांबरे,सांबरे, नचिकेत प्रकाशन, नागपुर, प्रथम आवृत्ती २००९, व्दितीय आवृत्ती २०११, तृतीय आवृत्ती २०१४ https://play.google.com/store/books/details/Anil_Sambare_Samarth_Sutre_Nachiket_Prakashan?id=KxR5BAAAQBAJ या वेबसाईट वरून
2 https://www.facebook.com/pages/category/Artist/Management-guru-Chanakya-Ramdas-Swami-234146276718711/. रामदास स्वामींच्या व्यतिरिक्त ख्रिस्तीपूर्व ३७५ मध्ये तक्ष्शीला येथे जन्मलेले चाणक्य ही एक महत्वाचे मॅनेजमेंटगुरू होते.
3 Sudhir Nirgudkar: Samarth Ramdas – Leadership in Thought and Action.
In: Ramdas – The Business Thinker. Essays on thoughts of Samarth Ramdas on Business Management. Ed. Sudhir Nirgudkar.
Majestic Publishing House, Pune.
Entnommen der Webseite: http://www.samarthramdas400.in › literature › lea… [PDF])
4 Sudhir Nirgudkar: Samarth Ramdas – Leadership in Thought and Action
5 सुधीर निरगुडकर दासबोध हा अध्यात्मिक अद्वैत-वेदांत (अद्वैत तत्वज्ञान, दैवी एकत्वाचा सिद्धांत) ग्रंथ समर्थ रामदासांनी १६५४ मध्ये त्यांचे अनुयायी कल्याण स्वामी यांना महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील शिवथरघळ नावाच्या गुहेत दिला होता, जीवनावरील धार्मिक जीवनावरील सूचना. व्यवस्थापन, मानवजातीसाठी सक्षम व्यवस्थापकाचे गुण. दासबोधात मानवी आत्म्याच्या वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहे. दासबोध हे कसे लिहावे याचे मार्गदर्शक आहे. https://www.amazon.in/Shreemat-Daasbodh-Samarth-Raamdaas-/=English/dp/B07QL8X8RP या वेबसाईट वरून.14?/-2
