— सौ. उज्वला तायडे —
करोना थोडा आटोक्यात आल्यानंतर मुलांना बदल म्हणून थोडं बाहेर जाण्याचे ठरवले होते. मग काय वेगवेगळ्या स्थळांची नावे समोर आली. थंड हवेच्या महाबळेश्वर ला सर्वांनी पसंती दिली.
महाबळेश्वर ला पोहोचताना तेथील होटेल कडे जाताना मधेच कुठेतरी दिसले पुस्तकांचा गाव3किमी. झालं तेव्हापासून कधी एकदा पुस्तकाच्या गावाला भेट देते असे होवू लागले.जिथे वाचन संस्कृती कुठेतरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तिथे अश्या प्रकारचा गाव म्हणजे अभिनव कल्पना आहे.
इतर प्रेक्षणीय स्थळे, पाहिल्यावर मात्र ठामपणे ठरवूनच घेतले आज पुस्तकांच्या गावाला जायचेच.
पुस्तकांच्या गावाला जाईपर्यंत खूप प्रश्न निर्माण झाले होते मनात. हे गाव कसे असेल, काय काय असेल पुस्तकांच्या गावी, असंख्य प्रश्न निर्माण झाले होते.
जसा पुस्तकांच्या गावात प्रवेश केला तसेच खूप वेगळे वातावरण तिथे वाटले. गावात प्रवेश करताच बाणांनी ठळकपणे लिहिलेले दिसत होते .गावात प्रवेश केल्यावर वेगळं असं वातावरण वाटत होतं तिथे. वेगवेगळ्या घरांवर, वेगवेगळ्या हॉटेल्स वर विविध पुस्तकांची, साहीत्य प्रकारांची चित्रे, आणि त्यावर लिहिलेले ‘या बसा, strawberry खात पुस्तके वाचण्याचा आनंद लुटा’.
भिलार या गावात 4 मे 2017 या दिवसापासून महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने अनोख पुस्तकाच गाव भिलार साकारण्यात आलं … आज या पुस्तकाच्या गावामध्ये 25 घरांमध्ये वेगवेगळया साहित्य प्रकाराची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. वाचन चळवळ वाढावी, येणाऱ्या पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी म्हणून मराठी भाषेतील नवे-जुने लेखन, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य आणि इतिहास याचे प्रत्येक घरात वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची दालन उभी केली आहेत. निवडलेल्या 25 घरांवर विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात आली आहेत. चित्राच्या संगतीनुसार त्या घरात वाचकाला साहित्य उपलब्ध होते. ज्या घरांच्या भिंतीवर निसर्ग चित्र काढण्यात आली आहेत, त्या घरात निसर्ग चित्रण अथवा प्रवास वर्णनपर साहित्य ठेवण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्र रेखाटलेल्या घरात ऐतिहासिक साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. संतांची चित्र काढलेल्या घरामध्ये संतवाड;मय व अध्यात्मिक पुस्तकांची भेट वाचकांना होते. अशा प्रकारे केवळ चित्रांवरुन पर्यटकाला त्या घरात कोणते साहित्य वाचनाला उपलब्ध आहे, याची माहिती मिळते.
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे ४५०० फुट उंचीवर वसलेले आहे.येथील हिरवा निसर्ग, सुंदर बगीचे, उदयाने, श्वास रोखायला लावणारी दृश्ये इत्यादीमुळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात. ब्रिटीश-कालीन वैभवसंपन्न आणि मनमोहक वाडे, इमारती या आजही त्यावेळच्या ब्रिटीश राजवटीची ओळख करून देतात.
पाचगणी हे महाबळेश्वर पासून जवळ (१८ कि.मी.) अंतरावर असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण असलेल्या निवासी शाळांमुळे हे ठिकाण प्रसिद्धीस आले आहे. पांचगणीला भेट म्हणजे एक सुखद अनुभवच होता.
येथील प्रेक्षणीय ‘पॉईंट’ हे डोंगराच्या टोकालाच आहेत.
पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावरील पाचगणीपासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर असलेल्या भिलार गावात आता एक अभिनव संकल्पना आता पुस्तकप्रेमींसाठी रुजू झाली आहे. कल्पना तशी साधी आहे पण अनोखी आहे.. इथे या, पुस्तके हाताळा, चाळा, वाचा.. ते देखील अगदी मोफत. थोडी थोडकी नव्हे तर जवळ जवळ १२००० ते १५००० पुस्तके.. या पुस्तकांची व्यवस्था त्यांच्या त्यांच्या साहित्यप्रकारानुसार गावातील वेगवेगळ्या २२ ठिकाणी केली आहे. यातील काही ठिकाणी तुम्ही निवास करू शकता, चहा – कॉफीचे घुटके मारत पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकता ही सोय मात्र मोफत नाही बरं.
या कल्पनेची अन प्रकल्पाची सुरुवात झाली काहीशी अशी झाली – महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व सांस्कृतिक मंत्री मा. श्री. विनोद तावडे यांनी दि. २७ फेब्रुवारी, २०१५ रोजी एका समारंभात बोलताना इंग्लंडमधील ‘हे ऑन वे’ या पुस्तकाच्या गावाचा संदर्भ देऊन, महाराष्ट्रातही असे ‘पुस्तकांचं गाव’ नक्की आकाराला येऊ शकेल, असा विचार मांडला.
या नव्या, अनोख्या, कल्पक व उत्साहवर्धक विचाराचे प्रसारमाध्यमे, साहित्यिक आणि सामान्य जनतेनेही स्वागत केले. याबाबत अनेक लेख व बातम्या छापल्या गेल्या. विविध समारंभ-संमेलनांतून विचार मांडले गेले. खुद्द मा. मंत्रिमहोदयांनी प्रकाशक, साहित्यिक व विचारवंतांशी याबद्दल चर्चा केली. अन या साऱ्यातूनच १ मे २०१७ रोजी भिलार पुस्तकांचे गाव म्हणून रुजू झाले.
माझ्या स्वप्नातील पुस्तकांच्या गावात प्रत्यक्ष भेट देऊन खूप खूप छान वाटले.
दिवसभर सर्वांनी strawberries खात पुस्तके वाचण्याचा आनंद लुटला.
ज्यांना कथा आवडतात, त्यांच्यासाठी वेगळे दालन, ज्यांना कादंबरी आवडतात त्यांच्यासाठी वेगळे हॉटेलमध्ये व्यवस्था. ललित, विज्ञान, गद्य, पद्य सर्वच विभाग वेगवेगळ्या ठिकाणी मांडलेले.
ज्या ज्या ठिकाणी पुस्तके ठेवली त्या त्या त्या ठिकाणी जाऊन आरामात पुस्तके वाचता येईल अशी व्यवस्था आहे.
भिलार गावातील लोकांनीं चांगलेच सहकार्य केले आहे या प्रकल्पासाठी .माणुसकीचा गाव म्हणावे लागेल या गावाला, आपल्या घरी पाहुणे आल्यावर ते पाहुणे जाईपर्यंत जशी अवस्था होते तशीच काहीशी अवस्था होत असावी ह्या गावातील लोकांची, असा विचार मनात सहज घर करून गेला.
वाचन हा एक अतिशय समृद्ध करणारा छंद मानला जातो, पुस्तके वाचल्याने आम्हाला असा आनंद मिळतो जो आपल्याला इतर कोणत्याही क्रियाकलापातून मिळत नाही. हे आपले ज्ञान वाढवते आणि आपली बुद्धी तीक्ष्ण करते फ्रान्सिस बेकन, इंग्रजी लेखक म्हणाले आहेत: “वाचन परिपूर्ण माणूस बनवते.
वाचनामुळे स्वत: ची उन्नती होते. वाचनाचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. वाचनाचा आनंद घेण्यासाठी एखाद्याला वाचण्याचीच गोड़ी आवशयक आहे.
पुस्तके वाचण्याचे अनेक मानसिक फायदे आहेत. ज्या लोकांना वाचण्याची सवय आहे त्यांना पुस्तके वाचण्याचा आनंद आणि महत्त्व माहित आहे. त्यांना त्याची जादू आणि सामर्थ्य माहित आहे जे आपल्याला ज्ञान देते आणि एक समझदार व्यक्ती बनवते.
जेव्हा वाचनाची बातमी ऑनलाइन येते तेव्हा आपल्यापैकी बहुतेक दिवस ऑनलाइन ब्लॉग, लेख, कथा आणि ट्वीट वाचण्याची सवय असते. बरेच ज्ञान आणि माहिती मिळविणे उपयुक्त आहे, परंतु एक चांगले पुस्तक वाचणे आपल्या मेंदूसाठी चांगले आहे. वाचन हा आपल्या मेंदूचा चांगला व्यायाम आहे.
खरोखरच कधीही आणि केव्हाही आपली बौद्धिक भूक वाचनातून शमविण्यासाठी भिलार गावाचा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय आहे.
पुस्तकांच्या गावाने हे सिध्द करून दाखवले की,
पुस्तके वाचणे हा वेळ वापरण्याचा सर्वात उपयुक्त मार्ग आहे. हे आपल्याला व्यस्त ठेवते आणि आयुष्यातील तणावातून मुक्त होण्यास मदत करते.
चांगले पुस्तक वाचणे आपल्याला एका नवीन जगात घेऊन जाते आणि आपल्या दिवसापासूनचा ताणतणाव दूर करण्यात मदत करते. त्याचे आपल्या मनावर, शरीरावर आणि आत्म्यावर बरेच सकारात्मक प्रभाव पडले आहेत. हे आपल्या मेंदूच्या स्नायूंना उत्तेजित करते आणि आपल्या मेंदूला निरोगी आणि मजबूत ठेवते.
खरोखरच पुस्तके वाचताना तेथील निसर्ग सौंदर्याचा गारवा वाचनात जाणवत होता.मुलंही चांगलीच रममाण झाली होती वाचनात.
“कृपया वाचकांनी गरजेनुसार पंखा व दिव्यांचा वापर करावा हे घर आपलेच आहे”, अशा प्रकारची सूचनाही काही घरात लिहीली आहे.मी अनुभवलंय रमणीय वाचन पुस्तकांच्या गावातील, एक गोड आठवण.
पुस्तकं आयुष्याला वळण देतात…. अनुभव, विचार, ज्ञान बळकट करतात…. शासनाचा पुढकार आणि गावकऱ्यांचा सहभाग याचं उत्तम उदाहरण असणार पुस्तकांचे गाव भिलार हा अभिवन उपक्रम आहे.भिलार गावसारखा जर प्रत्येक गाव झाला तर नक्कीच वाचन संस्कृती टिकून राहण्यासाठी मदत होईल.
तसेही म्हटलेच आहे ‘वाचल तर वाचाल.’
खरंच ‘कुतुहल’ च आहे न पुस्तकांच्या भिलार या गावाचे.मी अनुभवलंय ‘कुतूहल’पुस्तकांच्या गावाचे, आपण सर्वांनी मिळून अनुभवा एकदातरी.
खूप छान लेख . मला अगदी पुस्तकांच्या गावाची सैर केल्यासारखे वाटले. खरंच खूप वाचनीय आणि माहितीपर लेख .