पावसाची ती सर..

 

-वैशाली चौधरी–

पावसाची ती सर येऊन गेली |

ओल्या मातीचा सुगंध देऊन गेली ||१||

पावसाची ती सर येऊन गेली |

सृष्टी हि सारी, बहरून गेली ||२||

पावसाची ती सर येऊन गेली |

रोम रोम माझा हर्षवून गेली ||३||

पावसाची ती सर येऊन गेली |

प्रीत तुझी माझी फुलवून गेली ||४||

पावसाची ती सर येऊन गेली |

आठवणी तुझ्या जागवून गेली ||५||

पावसाची ती सर येऊन गेली |

तुला जे सांगावे,  तीच ऐकून गेली ||६||

पावसाची ती सर येऊन गेली |

चिंब चिंब मला भिजवून गेली ||७||

पावसाची ती सर येऊन गेली |

नयन हे माझे पाणावून गेली ||८||

पावसाची ती सर येऊन गेली |

लेखणीतून माझ्या हि कविता देऊन गेली ||९||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *