डॉक्टर हृषिकेश दामले यांनी 2003 मध्ये Atrimed फार्मास्युटिकल्सची स्थापना केली. सुमारे 100 कोटींची उलाढाल असलेली ही कंपनी जगातील 40हून अधिक देशांमध्ये निर्यात करते. स्किनकेअरमधील उत्पादनांसह भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या हर्बल कंपन्यांपैकी एक असा या कंपनीचा नावलौकिक आहे.
Atrimed बायोटेकमध्ये त्यांनी वनस्पतींच्या रेणूंची जगातील सर्वात मोठी लायब्ररी तयार केली आहे तसेच इम्यूनोलॉजी, कॅन्सर बायोलॉजी, व्हायरोलॉजी आणि इन्फ्लॅमेशन यासारख्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी संगणकीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेची स्थापना केली आहे. Atrimed फार्मास्युटिकल्स स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याचे कार्य सातत्याने करत आली आहे.
कन्नड भाषेत विज्ञान समजावून सांगण्यात निपुण असलेले डॉक्टर हृषिकेश दामले यांना अर्थशास्त्र, व्यवसाय
प्रशासन, वैधानिक कायदे, ट्रेड मार्क्स आणि आयपीआर, ब्रँडिंग आणि मार्केटिंग, आर्थिक व्यवस्थापन यांची देखील चांगली जाण आहे; असे हे व्यासंगी व्यक्तिमत्त्व आपल्याला 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहे.
याच दिवशी महाराष्ट्र मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येईल व त्यांना ‘भीष्म बक्षी ‘पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या समारंभात सहभागी व्हावे अशी आपल्याला विनंती आहे.
महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या ‘कलादालन 2022’ या स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉक्टर ऋषिकेश दामले यांच्या हस्ते करण्यात येईल.
