सनविवि माहितीपूर्ण लेख   संत तुकाराम महाराज

  संत तुकाराम महाराज

 

–राजेन्‍द्र पडतुरे 

 

       

१६०८ ते १६४९

सतराव्‍या शतकातील संत कवी तुकाराम महाराज जनमानसात तुका या नावाने प्रसिध्‍द, महाराष्‍ट्रातील मराठा समाजाचे प्रतिनिधी होते. तुकाराम महाराजांना हे नाव कसे आणि कोठून मिळाले असावे, या बद्दल काही पुरावे उपलब्‍ध नाहीत, पण त्‍यांच्‍या नावातील प्रत्‍यय राम हे मात्र भगवान रामाच्‍या नावाशी जुळते आहे. धान्‍य व्यापाऱ्याच्या घरात त्‍यांचा जन्‍म झाला होता. जातीने शुद्र असून ते धान्‍याचा व्‍यापार करत असत. धंद्यात पूर्ण खोट खाल्‍ल्‍यानंतर सर्व संग परित्‍याग करून तुकाराम बुवा 

निरिच्‍छपणे मंदिरांमध्‍ये राहू लागले. त्‍यांनी वाचनकला संपादन करून संत एकनाथांच्‍या अभंगांचे गान सुरू केले. एकदा दैवी दृष्‍टांतात देवानी कलेल्‍या आज्ञेनुसार तुकाराम महाराजांनी ६००० अभंग लिहिले. समाजातील उच्‍चभ्रू ,द्वेष्‍टया मंडळींनी त्‍यांची हेटाळणी आणि छळवणूक चालू केली आणि त्‍यांच्‍या अभंगांना मान्‍यता देण्‍यास नाकबुली दर्शवली. त्‍या वागणुकीमुळे हतबल न होता त्‍यांनी नामस्‍मारणावर भर दिला आणि देवाच्‍या आदेशानुसार ६००० अभंगांची रचना पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी देऊ केलेल्‍या सुवर्णमुद्रा त्‍यांनी त्‍यांच्‍याच द्वेष्‍टया ब्राम्‍हण कुळातील व्‍यक्‍तींमध्‍ये दान करून दानशूर आणि आपल्‍या द्वेष्‍टयांचेही भले करणारा असा लौकिक मिळवला. त्‍यांनी असे दाखवून दिले,की तुम्‍ही उच्‍च किंवा नीच कुळाचे असाल,तरी मनापासून जर तुम्‍ही भक्‍ती कराल, तरी ती देवाला पावते.

 https://en.wikipedia.org/wiki/Tukaram. 

मी प्रमुख संशोधन प्रकल्‍पांतर्गत समर्थ रामदास स्‍वामींच्‍या मनाचे श्‍लोक जर्मन भाषेत भाषांतरीत करत आहे. यासाठी मी जी प्रस्‍तावना लिहिली आहे, त्यामधे महाराष्‍ट्राच्या महत्‍वाच्या संतकवीं संबंधित चर्चा आहे. त्‍या वरूनच मला ही लेखमाला लिहिण्‍याची कल्‍पना सुचली. 

राजेन्‍द्र पडतुरे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *